|Saturday, March 28, 2020
You are here: Home » क्रिडा » इंग्लंड संघातून रूनीला वगळले

इंग्लंड संघातून रूनीला वगळले 

वृत्तसंस्था / लंडन

पुढील महिन्यात होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक पात्रफेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील फ गटातील स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यासाठी तसेच फ्रान्सविरूद्धच्या मित्रत्वाच्या सामन्यासाठी इंग्लंड फुटबॉल संघातून अनुभवी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू वेन रूनीला वगळण्यात आले आहे. इंग्लंडतर्फे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रूनीच्या नावावर आहे.

कर्णधार रूनीला मँचेस्टर युनायटेड संघातही आपले स्थान राखता आले नाही. त्याचप्रमाणे चालू वर्षांच्या प्रारंभी जर्मनी आणि लिथुनिया यांच्याविरूद्ध झालेल्या सामन्यात रूनीला इंग्लंड संघात स्थान देण्यात आले नव्हते. या आगामी पात्र फेरीच्या सामन्यांसाठी इंग्लंडचा 25 जणांचा संघ घोषित केला असून टोटेनहॅमच्या ट्रिपेरला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना 10 जूनला तर इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातील सामना 13 जूनला खेळविला जाईल.

Related posts: