|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरात पुन्हा घरफोडीसह सव्वातीन लाख लांबवले

शहरात पुन्हा घरफोडीसह सव्वातीन लाख लांबवले 

प्रतिनिधी/ सांगली

  गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू झालेले घरफोडया आणि चोऱयांचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. बुधवारी  विश्रामबाग परिसरातील वृंदावन व्हिलाजवळ सोमवारी रात्री घरफोडी झाली असतानाच पुन्हा विश्रामबागमध्येच एक घरफोडी आणि ट्रक अड्डयावरून अडीच लाखांची चोरी झाली आहे. या दोन्ही घटनांत चोरटयांनी सव्वातीन लाखाहून अधिक ऐवज लंपास केला आहे.

  शहरात चोऱया आणि घरफोडयांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. चोरटयांनी विशेषतः विश्रामबाग परिसरच टार्गेट केल्याचे चित्र आहे.  राजू विठृटल परीट वय 33 या हमालाच्या  वृंदावन व्हिलाजवळील घरांत चोरटयांनी डल्ला मारून एक लाखांवर ऐवज  दोनच दिवसांपुर्वी लांबवला होता . कपाटात ठेवलेले 8.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगसुत्र, दोन पिळयाच्या अंगठया, दोन टॉप्स, कर्णफुले दोन, दहा ग्रॅम सोन्याची बोरमाळ, दोन सोन्याचे बदाम, चार सोन्याच्या लहान अंगठया, पंजनचे तीन जोड आणि 4800 रूपयांची रोकड असा सुमारे एक लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

 या प्रकरणाचा तपास होण्यापुर्वीच विश्रामबाग परिसरातील विधाता कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिराशेजारी असणाऱया जीवन शहाजी जाधव वय 35 यांच्या घरात चोरटयांनी हात साफ केले आहेत. सात हजारांची रोकड आणि 53 हजारांचे दागिणे लंपास केले आहेत. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरटयांनी डल्ला मारला आहे.

 ट्रक अडडय़ावरून अडीच लाख लंपास  

येथील पद्मा टॉकीजच्या पाठीमागे असणाऱया जुन्या ट्रक अड्डयावरून एका ट्रकमधून अडीच लाख रूपये लंपास करण्यात आले आहेत. संदीप चव्हाण वय 24 हा रा.केळवेडी अहमदनगर सध्या शांतीनगर कल्याण जि.ठाणे हा मंगळवारी रात्री ट्रक पार्किंग करून झोपला होता. रोडलाईन्सचे दोन लाख 70 हजारांची भाडच्यी रक्कमही ट्रकमध्येच ठेवण्यात आली होती. त्यातील अडीच लाख अज्ञात चोरटयाने लांबवले असल्याची तक्रार त्याने शहर पोलीसात दिली आहे. एका बाजूला नाकाबंदीसाठी संपूर्ण जिल्हा पोलीस दल रस्त्यावर उतरले असतानाच शहरातील चोऱया आणि घरफोडय़ांचे सत्र चालुच असल्याने नागरिकांतून घबराटीचे वातावरण पसरले आहे.

 

Related posts: