|Friday, November 15, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स पहिल्यांदाच 31 हजारापलिकडे

सेन्सेक्स पहिल्यांदाच 31 हजारापलिकडे 

बीएसईचा सेन्सेक्स 278, एनएसईचा निफ्टी 85 अंशाने वधारला

वृत्तसंस्था / मुंबई

जून सीरिजला दमदार तेजीने प्रारंभ झाला आणि बाजाराने पुन्हा इतिहास नोंदविला आहे. बाजार दिवसभरात विक्रमी उच्चांकावर बंद झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 31 हजारांचा टप्पा पार केला, तर निफ्टी पहिल्यांदाच 9,600 नजीक पोहोचला आहे. दिवसभरात सेन्सेक्स 31,074 आणि निफ्टी 9,604 पर्यंत पोहोचले होते.

बीएसईचा सेन्सेक्स 278 अंशांच्या तेजीने 31,028 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 85 अंशांच्या मजबूतीने 9,595 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात जोरदार खरेदी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 293 अंशाने वधारत 14,520 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 237 अंशाने वधारत 15,086 वर बंद झाला.

धातू, वाहन, बँकिंग, एफएमसीजी, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागांत चांगली खरेदी झाली. बँक निफ्टी 0.75 टक्क्यांनी वधारत 23,362 या विक्रमी पातळीवर बंद झाला. निफ्टीचा धातू निर्देशांक 3.4 टक्के, वाहन निर्देशांक 1.2 टक्के आणि एफएमसीजी निर्देशांक 1.8 टक्क्यांनी वधारला.

बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 1.5 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 1.6 टक्के, ऊर्जा निर्देशांक 1.6 टक्के, तेल आणि वायू समभागात 2.1 टक्क्यांनी मजबूती आली. औषध आणि पीएसयू बँक समभागात मात्र विक्री आली होती. निफ्टीचा औषध निर्देशांक 1.5 टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरले.

दिग्गज समभागांची कामगिरी

टाटा स्टील, भेल, वेदान्ता, हिंडाल्को, इंडियाबुल्स हाऊसिंग, बीपीसीएल, आयटीसी, रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि एशियन पेन्ट्स 5.6-2 टक्क्यांनी वधारले. सन फार्मा, सिप्ला, आयओसी, ल्यूपिन, टीसीएस आणि डॉ. रेड्डीज लॅब 4-0.6 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात एचपीसीएल, 3एम इंडिया, अशोक लेलँड, बर्जर पेन्ट्स आणि जिंदाल स्टील 11.4-5.3 टक्क्यांनी मजबूत झाले. स्मॉलकॅप समभागात एचईजी, स्वेलेक्ट एनर्जी, श्रेयश शिपिंग, सिन्टेक्स इन्डस्ट्रीज आणि पॅनिसिया बायोटेक 20-12.7 टक्क्यांनी वधारले.

Related posts: