|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीलंकेत पूर आणि भूस्खलन

श्रीलंकेत पूर आणि भूस्खलन 

23 जणांचा मृत्यू, बचावकार्यात अडथळे, स्थानिकांचा सहभाग

कोलंबो :

शेजारील देश श्रीलंकेला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. पूर तसेच भूस्खलनामुळे लाखो लोक प्रभावीत झाले असून  23 लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय इमारत संशोधन संघटना (एनबीआरओ) ने गाले, केगाले, रतनपूरा, कलूतारा तसेच हंबनतोटा या पर्वतीय क्षेत्रातील रहिवाशांना भूस्खलनाचा इशारा जारी केला आहे.

श्रीलंकेच्या बहुतांश भागात गुरुवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. देशात नैऋत्य मान्सून वातावरण सक्रिय होत असल्याने दक्षिण आणि पश्चिम भागात हि परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. संपुर्ण बेटाला बसलेल्या वादळी तडाख्यामुळे आता पर्यंत 23 जणांना जीव गमावावा लागले असून लाखो लोक प्रभावीत झाल्याचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून सांगण्यात आले आहे. केंद्राकडून केलानी आणि कालु गंगा नदीनजीक कमी ऊंचीवर राहणाऱया नागरिकांना संभाव्य पूर परिस्थितीबद्दल दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. बहुतेक नदय़ांच्या जलपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे गंभीर पूरपरिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सीद्ध रहावे असे डिएमसीकडून सांगण्यात आले आहे.

श्रीलंकन वायू आणि नौदलाकडून मदत आणि बचावकार्य सुरु असून त्यासाठी हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर करण्यात येत आहे. नगदी पीकासाठी झालेल्या बेसूमार जंगलतोडीमूळे अलीकडच्या काळात श्रीलंकेला मान्सूनमध्ये वारंवार भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे. गतवषी झालेल्या एका मोठय़ा भूस्खलनात 100 हून अधिक जणांचा अंत झाला होता.