|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नगरपरिषदेची सभा खेळीमेळीत

नगरपरिषदेची सभा खेळीमेळीत 

प्रतिनिधी/ वाई

वाई नगरपरिषदेची विशेष सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विषय पत्रिकेवर जरी 9 विषय असले तरी उपविषयांवर झालेल्या त्याच त्या चर्चेच्या गुऱहाळामुळे सभा सुमारे चार तास लांबली. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषय काही सुचवून मंजूर करण्यात आले.

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. शहरातील कचरा उचलण्याच्या व इतर टेंडरमधील ठेकेदारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने सदर निविदा रद्द करण्यात आल्याचे सांगितल्यावर उपनगराध्यक्ष सावंत यांनी पालिकेत ठेकेदार येण्यास तयार नाहीत तरी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी त्यांना मुदत देण्यात यावी, असे सांगितले. त्यावर मुख्याधिकारी यांनी टेंडर मंजूर करणे अथवा नाकारणे हा अधिकार निविदा समितीस असून नियमांनुसारच टेंडर मंजूर केली जातात, त्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा केला जाणार नाही. याचे रिटेंडरींग काढण्यात येईल, असे सांगितले. तर नगरसेवक महेंद्र धनवे यांनी प्रत्येक ठेकेदारास दिलेल्या मुदतीत काम करण्याचे बंधन घालण्यात यावे. तसेच ठेकेदारांना प्रत्येकवेळी मुदतवाढ दिल्याने पालिकेवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडतो व कामही वेळेत पूर्ण होत नसल्याची खंत सभागृहासमोर मांडली.

त्यावर याबाबत ठेकेदारांना योग्य तो कालावधी दिला जाईल व विहीत कालावधीतच कामे पूर्ण करून घेतली जातील, असे काटकर यांनी सांगितले. यावेळी विषयपत्रिकेवरील बांधकाम विभागाकडील 6 विविध कामांसाठी मागविलेल्या निविदा मंजूर करणे, आरोग्य व इतर विभागाकडील वार्षिक ई निविदा मंजूर करणे, वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्राप्त झालेल्या अर्ज धारकांना हागणदारी मुक्त योजनेअंतर्गत प्राप्त प्रोत्साहनपर अनुदानातून व 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून शौचालय बांधकामासाठी अनुदान मंजूर करणे, नगरपरिषदेच्या कचरा डेपोच्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी दर निश्चित करून परवानगी देणे, शासनाच्या 2 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत नगरपरिषदेस दिलेल्या उदिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड करण्यासाठी येणाऱया खर्चास मंजूरी देणे, पालिकेस विविध संस्थांच्या एसआरएस निधीतून प्राप्त झालेल्या निधीच्या विनियोगासाठी स्वच्छता कोष समिती स्थापन करणे या विषयातील उपविषय चर्चेअंती दुरूस्त्यांनंतर मंजूर करण्यात आले.

नगरसेवक प्रदीप चोरगे, चरण गायकवाड, संग्राम पवार, भारत खामकर, राजेश गुरव, दिपक हजारे, महेंद्र धनवे, सतीश वैराट, ऍड. चव्हाण, दीपक ओसवाल, सीमा नायकवडी, स्मिता हगीर यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर नगरसेवक काटेकर, प्रियांका डोंगरे, सुनीता चक्के, रेश्मा जायगुडे, रुपाली वनारसे, शितल शिंदे, आरती कांबळे, वासंती ढेकाणे, सुमैय्या इनामदार, नितीन नायकवडींनी विषयांचे वाचन केले. दिपक गोंजारी, नारायण गोसावी, राजेंद्र गायकवाड, राजन बागुल यांनी सहकार्य केले.