|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दरोडय़ाच्या तयारीतील तिघे जेरबंद

दरोडय़ाच्या तयारीतील तिघे जेरबंद 

कुपवाड / वार्ताहर

कुपवाड परिसरात तसेच राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहने अडवून रोड रॉबरी करण्याच्या तसेच दरोडा टाकण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रांसह फिरणाऱया सराईत टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना शनिवारी पहाटे यश आले. सहाजणांच्या टोळीपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मारुती कारसंह धारदार घातक शस्त्रे जप्त केली आहेत. मात्र, सहांपैकी अन्य तिघे अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले आहेत. पोलीस त्या तिघांचा कसून शोध घेत आहेत.

याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये संशयित सलमान कमरुद्दीन मुल्ला (22, रा.राजीवनगर,सांगली), यासीन सलीम इनामदार (19, रा.शामरावनगर, सांगली) यांचा समावेश आहे. या दोघांना मिरज न्यायालयाने 31 मे पर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर पळून गेलेल्या चौघांपैकी शहाबाज उर्फ जग्वार रियाज शेख (रा.अलिशान चौक, सांगली) याचा शोध घेऊन शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे. उर्वरित सद्दाम मुजावर (हडको कॉलनी, सांगली), बाबू उर्फ बाबा नगरे (रा. लव्हली सर्कल, सांगली) व आशा उर्फ आसीफ (रा.पाकीजा मज्जीद, सांगली) हे अद्याप पसार असून यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गुंडा विरोधी पथक व कुपवाड पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे कर्मचारी रवाना झाले आहेत. सहाजणांच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 399 सह आर्म ऍक्ट 4, 25 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. सदरचे संशयीत पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन यापैकी सलमान मुल्ला याच्यावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, सरकारी कर्मचाऱयावर हल्ला याप्रकरणी सांगली शहर, विश्रामबाग पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. सरकारी नोकरांवर हल्लाप्रकरणी त्याला सहा महिने सक्तमजुरी व तीनशे रुपये दंडाची शिक्षा लागली आहे. तर सद्दाम मुजावर याच्यावरही विश्रामबाग पोलिसांत जबरी चोरी, खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या सहाजणांनी गुह्यात वापरलेली मारुती कारही चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांनी कारच्या नंबरमध्ये खाडाखोड करुन बदल केला आहे. या कारच्या मालकाचाही शोध सुरु आहे.

उपाधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशाने मालमत्ता विषयक दरोडा, घरफोडी, जबरी चोरी यांसारखे गुन्हे रोखण्यासाठी जिह्यात वेळोवेळी नाकाबंदी, रात्रगस्त, पेट्रोलिंग करुन गुह्यांना प्रतिबंध करण्याचे प्रयत्न पोलिसांकडुन सुरु आहेत. शुक्रवारी 26 मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सांगली शहरचे पो.निरीक्षक अनिल गुजर रात्रगस्तीवर असताना कुपवाड हद्दीलगतच्या तानंग गावातील पीर चौकात मारुती कार (क्रं.एम.एच.12 पी.ए.7746) यामधुन जाणाऱया सहाजणांना संशयावरुन थांबवून चौकशी केली. ते सहाजण गाडीत दाटीवाटीने बसले होते. यावेळी त्यांची विचारपूस करत असताना त्यांनी नाव व पत्ता खोटे सांगितली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तसेच सर्वजण घाबरल्याने पोलिसांचा संशय बळावला. संशयावरुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताना अंधाराचा फायदा घेत सहापैकी चारजण पळून गेले तर दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. दोघांना पकडून मारुती कारची झडती घेतली असता कारमध्ये एक जांबिया व एक सुरा अशी दोन धारदार घातक शस्त्रे सापडली. दोघांची कसून चौकशी केली असता सहाजण दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. त्यानुसार सहाजणांवर गुन्हे दाखल केले. पसार झालेल्या अन्य चौघांपैकी शहाबाज शेखला शनिवारी पहाटे कुपवाड पोलिसांच्या डीबी पथकाला तानंग गावात पकडण्यात यश मिळाले. या गुह्याचा तपास पो.उपाधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जी.नदाफ करीत आहेत. 

दहा हजाराचे बक्षीस जाहीर

  सांगली शहरचे निरीक्षक अनिल गुजर व चालक राहुल शिंगटे यांनी धाडस व सतर्कता दाखवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱया टाळीला तानंग गावात गजाआड करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या धाडसी कामगिरीरीमुळे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुजर यांना दहा हजाराचे बक्षीस जाहीर करुन कामाचे कौतुक केले.

Related posts: