|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मुंबईतील पोलिसाचा कणकवलीत ‘हृदयविकाराने मृत्यू

मुंबईतील पोलिसाचा कणकवलीत ‘हृदयविकाराने मृत्यू 

कणकवली : मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेले व सध्या सुट्टीनिमित्त गावी आलेल्या विलास प्रभाकर कदम (50, मिठबाव-कबीरनगर) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

कदम हे सुट्टीनिमित्त मिठबाव या आपल्या गावी आले होते. रविवारी सकाळच्या सुमारास अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईक, कुटुंबीय त्यांना कणकवली येथे उपचारासाठी आणत होते. मात्र, दुपारी एकच्या सुमारास बेळणेदरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. घटनेची खबर जयवंत कानोजी मिठबावकर (52, मिठबाव-कबीरनगर) यांनी कणकवली पोलिसांत दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अमोल साळुंखे करत आहेत.

Related posts: