|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » केंद्र सरकारचे पशू व्यापार नियम बेकायदेशीर : ममता बॅनर्जी

केंद्र सरकारचे पशू व्यापार नियम बेकायदेशीर : ममता बॅनर्जी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गायींचे मांस विक्रीबाबत केंद्र सरकारचा निर्णय बेकायदेशीर असून, या अधिसूचनेचे पालन पश्चिम बंगाल सरकार करणार नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. ममता म्हणाल्या, पशू व्यापार नियमानुसार गायींचे मांस विक्रीबाबत केंद्र सरकारचा निर्णय भारताच्या संघिय संरचनेचा नाश करणे आणि राज्य सरकारच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे संविधानानुसार, पशुधन व्यापार नियमन हा विषय राज्याच्या अखत्यारित येत आहे. तसेच केंद्र सरकारचा हा निर्णय पूर्णपणे असंविधानिक आहे. त्यामुळे आम्ही या निर्णयाचा स्वीकार करु शकत नाही. आम्ही केंद्राच्या या निर्णयाला आव्हान देणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.