|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कवलापूरचा ग्रामसेवक व लिपिक लाचलुचतपच्या जाळयात

कवलापूरचा ग्रामसेवक व लिपिक लाचलुचतपच्या जाळयात 

प्रतिनिधी/ सांगली

रमाई घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचा घरकुलाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी 20हजाराची मागणी करणारा कवलापूर ता.मिरज येथील ग्रामविकास अधिकारी अजित पांडूरंग माने वय 40 रा. वैष्णवी अर्पाटमेंट फ्लॅट नंबर नऊ शंभर फुटी रोड सांगली मूळ गांव कंरजे ता. खानापूर  आणि लिपिक अनिल यमाजी खाडे वय 44 रा.दत्तमाळ गंजीखाना रोड कवलापूर हे दोघेजण सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडले.

यातील तक्रारदार व त्यांचा भाऊ या दोघांनी कवलापूरचे ग्रामविकास अधिकारी व लिपिक या दोघांच्याविरोधात सहा एप्रिल 2017 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन या दोघांवर कारवाई केली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची ऍन्टी करप्शन ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे दहा एप्रिल 2017 रोजी पडताळणी केली असता या पडताळणीमध्ये लोकसेवक अजित माने यांनी 18हजार व लिपिक खाडे यांनी दहा हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले. त्यानुसार माने व खाडे या दोघांच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला. रात्री उशिरा या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले.तसेच कवलापूर ग्रामपंचायतीतील दप्तरही ताब्यात घेऊन गुन्हा तसेच अटकेची कारवाई केली.

दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱयांनी शासकीय कामाकरिता लाचेची मागणी केल्यास संबधितांनी लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या सांगलीतील कार्यालयाशी 0233-2373095 या टोल फ्री नंबरवर  संपर्क साधावा. तसेच ऍन्टी करप्शन ब्युरो तर्फे मोबाईल ऍप सुरू करण्यात आले आहे.डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू एसीबीमहाराष्ट्र नेट या संकेतस्थळावरही हे ऍप उपलब्ध आहे.

दरम्यान कवलापूरचे ग्रामविकास अधिकारी व लिपीक या दोघांच्याविरोधात कवलापूरमधील आजी माजी ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थाकडून मोठया प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर लगेचच हे दोघे लाचलुचपतच्या जाळयात सापडल्याने कवलापूरमध्ये एकच खळबळ माजली आहे.