|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणीत मायक्रो फायनान्स विरुद्ध एल्गार

निपाणीत मायक्रो फायनान्स विरुद्ध एल्गार 

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणीत कर्नाटक दलित संघर्ष समिती (आंबेडकरवाद) महिलांतर्फे मायक्रो फायनान्स विरुद्ध मोठा एल्गार करण्यात आला. रेखाताई कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे 500 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला.

यावेळी रेखाताई कांबळे यांनी, निपाणी परिसरात सुमारे 26 मायक्रो फायनान्स कार्यरत आहेत. काही महिन्यांपासून अनेक फायनान्सवाल्यांनी महिला बचत गटांना त्रास देण्याचे काम चालू केले आहे. त्यांनी चालविलेला हा अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाही. आम्ही कोणतेही पैसे भरणार नाही, आमची कर्जमाफी झालीच पाहिजे. कर्नाटक दलित संघर्ष समिती (आंबेडकरवाद) यांच्यावतीने आम्ही आतापर्यंत लढा देत आलो आहोत. यापुढेही आमचा मायक्रो फायनान्स विरुद्ध लढा चालूच राहिल. आम्ही आमच्या न्यायासाठी लढत आहोत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अशोक लाखे यांनी, मायक्रो फायनान्सवाल्यांचा अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाही. महिलांचा बचत गट निर्माण करून हे फायनान्सवाले त्यांची आर्थिक लुबाडणूक करीत आहेत. गेल्या दोन वर्षामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महिला बचत गटांना पैसे भरणे शक्य नाही. त्यांची 100 टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे, असे सांगितले.

यावेळी कर्नाटक दलित संघर्ष समितीचे शेखर प्रभात यांनी, सर्व फायनान्सवाले महिला बचत गटाची ही चालवलेली आर्थिक गळचेपी त्वरित थांबवली पाहिजे. त्यांचा हा जर आर्थिक अत्याचार थांबत नसेल तर त्यांना या भागातून हद्दपार करा, असे सांगितले.

कार्यक्रमास बसवराज ढाके, मंजुनाथ घट्टी, निंगाप्पा कांबळे, मंजुनाथ माळगे, विजय शास्त्राr, राजू घस्ते, गुंडूराज ज्योती, सुनीता लाखे, रुपाली मोट्टनावर, संगीता कांबळे, छाया कांबळे, राजश्री कांबळे यांच्यासह एकसंबा, जनवाड, गळतगा, सिदनाळ, बेनाडी, सुळगाव, खडकलाट, नवलिहाळ, चिखलव्हाळ, कुमठोळी, निपाणी, नांगनूर, भिवशी, हंचिनाळ, शिरगाव, अम्मनगी इत्यादी ठिकाणाहून महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Related posts: