|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » बारावीचा निकाल जाहीर,कोकणची ‘तेजस’कामगिरी

बारावीचा निकाल जाहीर,कोकणची ‘तेजस’कामगिरी 

ऑनलाईन टीम / पुणे  :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून पुन्हा एकदा कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल 95.20टक्के लागला आहे.

राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला आहे. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांची संख्या 86.65 टक्के तर मुलींची संख्या 96.05 टक्के इतकी आहे. पुणे विभागाचा निकाल 91.96टक्के, मुंबई विभागाचा निकाल 88 टक्के, लातूर आणि नाशिक विभागाचा 88.22 टक्के लागला आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तर 9 जूनला विद्यार्थ्यांना गुण पत्रिका दुपारी 3 वाजल्यापासून शाळा व कॉलेजेसमधून घेता येणार आहेत.

 

Related posts: