|Monday, August 19, 2019
You are here: Home » क्रिडा » किर्गीओस, वावरिंका, डेल पोट्रो, व्हर्डास्को दुसऱया फेरीत

किर्गीओस, वावरिंका, डेल पोट्रो, व्हर्डास्को दुसऱया फेरीत 

वृत्तसंस्था/ पॅरिस

ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस, अर्जेन्टिनाचा जुआन मार्टिन डेल पोट्रो, युपेनची इलिना स्विटोलिना, मॅडिसन कीज, व्हर्डास्को, वावरिंका, इस्टोमिन यांनी फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. अलेक्झांडर क्हेरेव्ह, सॅम क्वेरी, जोहाना कोन्टा, मोनिका बार्थेल यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

18 व्या  मानांकित किर्गीओसने दुखापतीची चिंता व भावनांवर नियंत्रण ठेवत जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबरचा 6-3, 7-6, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. त्याने या सामन्यात एकूण 12 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्यापैकी सहा पहिल्या सेटमधील होत्या. 29 व्या मानांकित जुआन मार्टिन डेल पोट्रोने पाच वर्षांच्या खंडानंतर रोलाँ गॅरोवर यशस्वी पुनरागमन करताना आपल्याच देशाच्या गुडो पेलाचा 6-2, 6-1, 6-4 असा पराभव केला. पोट्रोला अनेकदा दुखापतींनी त्रस्त केले असून या स्पर्धेतही त्याने गेल्या शुक्रवारी खेळणार असल्याचे निश्चितपणे सांगितले होते. 2009 मध्ये त्याने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याने या सामन्यात 13 बिनतोड सर्व्हिस केल्या. 2012 नंतर पॅरिसमधील क्लेकोर्टवर त्याने पहिला सामना खेळला. अन्य एका सामन्यात फ्रान्सच्या गिलेस सायमनला पहिल्या फेरीत बाहेर पडावे लागले. जॉर्जियाच्या निकोलोझ बेसिलाश्विलीने त्याला 1-6, 6-2, 6-4, 6-1 असे हरविले. त्याची लढत क्हिक्टर ट्रॉयकीशी होईल.

वावरिंका विजयी, क्वेरी, व्हेरेव्ह पराभूत

रोम स्पर्धेत ज्योकोव्हिकला पराभवाचा धक्का दिलेल्या दहाव्या मानांकित अलेक्झांडर क्हेरेव्हला या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत फर्नांडो व्हर्डास्कोकडून पराभवाचा धक्का बसला. व्हर्डास्कोने हा सामना 6-4, 3-6, 6-4, 6-2 असा जिंकून दुसरी फेरी गाठली. तिसऱया मानांकित स्टॅनिसलास वावरिंकाने जोसेफ कोवालिकचा 6-2, 7-6 (8-6), 6-3 असा पराभव केला. याशिवाय हय़ेऑन चुंगने 27 व्या मानांकित सॅम क्वेरीवर 6-4, 3-6, 6-3, 6-3, डेनिस इस्टोमिनने अर्नेस्टो इस्कोबेडोवर 7-6 (7-3), 6-3, 6-4, केविन अँडरसनने मॅलेक जझिरीवर 7-6 (7-0), 6-3, 7-6 (7-4), मार्टिन क्लिझनने लोकोलीवर 7-6 (7-4), 6-3, 4-6, 0-6, 6-4 अशी मात करून दुसऱया फेरीत स्थान मिळविले.

स्विटोलिना विजयी

महिला एकेरीत युपेनच्या पाचव्या मानांकित स्विटोलिनाने सहजपणे दुसरी फेरी गाठताना कझाकच्या यारोस्लाव्हा श्वेडोवाचा 6-4, 6-3 असा पराभव केला. तिने अलीकडेच झालेल्या रोम क्लेकोर्ट स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. तिची पुढील लढत बल्गेरियाच्या स्वेतलाना पिरोन्कोव्हाशी होईल. पिरोन्कोव्हाने जर्मनीच्या मोनिका बार्थेलचा 6-0, 6-4 असा धुव्वा उडविला. ब्रिटनच्या सातव्या मानांकित जोहाना कोन्टाला मात्र पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. तैवानच्या सीह सु वेईने तिला 1-6, 7-6 (7-2), 6-4 असे नमविले. सु वेईची पुढील लढत अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडशी होईल. टाऊनसेंडने जपानच्या पात्रता फेरीतून आलेल्या मियू काटोचा 6-4, 6-0 असा पराभव केला.

म्लाडेनोविक दुसऱया फेरीत

महिलांच्या अन्य सामन्यात फ्रान्सच्या 13 व्या मानांकित क्रिस्टिना म्लाडेनोविकने संघर्षपूर्ण विजय मिळविताना अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर 3-6, 6-3, 9-7 अशी मात केली. 19 व्या मानांकित कोको व्हॅन्डेवेघला मॅग्डालेना रिबरीकोव्हाकडून 1-6, 4-6 अशी पत्करावी लागली. 12 व्या मानांकित मॅडिसन कीजने ऍश्ले बार्टीचा 6-3, 6-2, सोराना सिर्स्टियाने शुआइ पेंगचा 6-3, 6-1, स्पेनच्या 21 व्या मानांकित कार्ला सुआरेझ नेव्हारोने मारिया सक्करीचा 6-4, 6-2, ऍलिझ कॉर्नेटने टिमीया बॅबोसचा 6-2, 6-7 (5-7), 6-2, पेत्र मार्टिकने कॅटरीना बोन्डारेन्कोचा 6-2, 7-5 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.