|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » काबूलमध्ये स्फोट, ८० जणांचा मृत्यू, ३५0जण गंभीर जखमी

काबूलमध्ये स्फोट, ८० जणांचा मृत्यू, ३५0जण गंभीर जखमी 

ऑनलाईन टीम / काबूल :

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज सकाळी बॉम्बस्फोट झाले. यात ८० जणांचा मृत्यू  झाल्याचे  सांगण्यात आले आहे तर ३५० जण जखमी झाले आहेत स्फोटनंतर विदेश दूतावास परिसरात सुरक्षा आणखी कडेकोट केली आहे.

या स्फोटामुळे भारतीय दूतावासाच्या इमारातीचे थोडे नुकसान झाले आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे. सुदैवाने भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, ईराणी दूतावासाला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला.मात्र अजून कोणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. याच परिसरात अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचे निवासस्थानही आहे.

 

Related posts: