|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » बालचित्रवाणी बंद होणार, राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

बालचित्रवाणी बंद होणार, राज्य सरकारकडून अध्यादेश जारी 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे. दैनदिन खर्चासाठी निधी नसल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाकडे दैनंदिन खर्चासाठी निधी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लवकरच ई-बालभारती नावाची संस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बालचित्रवाणी संस्था सुरू होती. ही संस्था चालवण्यासाठी निधी नसल्याने संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर सर्व कर्मचाऱयांना आजच कार्यमुक्त करण्याचे आदेश देखील राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना मोठा धक्का बसला आहे.

 

Related posts: