|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » आधार माहिती पूर्णपणे सुरक्षित : युआयडीएआय

आधार माहिती पूर्णपणे सुरक्षित : युआयडीएआय 

नवी दिल्ली :

 कोटय़वधी आधारकार्डधारकांचा बायोमॅट्रिक डाटा सुरक्षित असून यावर कोणताही सायबर हल्ला झालेला नाही असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) एका आरटीआय अर्जाच्या उत्तरादाखल सांगितले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून आधार माहितीच्या सायबर सुरक्षेशी संबंधित माहिती उपलब्ध करण्यास प्राधिकरणाने नकार दिला आहे. आरटीआय कायद्याचे कलम 8 (1) (अ) नुसार माहिती उपलब्ध करता येत नाही. आधारची माहिती राष्ट्रीय संपदा असून ती सार्वजनि केल्यास सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असे प्राधिकरणाने म्हटले. आरटीआय अर्जावर प्राधिकरणाने आधारच्या माहितीवर कोणताही सायबर हल्ला झालेला नाही असे स्पष्ट केले आहे. प्राधिकरण सध्या 114 कोटी भारतीयांची माहिती 6000 पेक्षा सर्व्हरद्वारे हाताळत आहे. द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीने कोटय़वधी भारतीयांचा आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती शासकीय पोर्टलच्या माध्यमातून सार्वजनिक झाल्याचा दावा केला होता. सरकारच्या विविध योजनांसाठी आधार अनिवार्य करण्यात आले असून याच्या माध्यमातून ही माहिती उघड झाल्याचेही पोर्टलने म्हटले होते.

 

Related posts: