|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » न्यायालयाच्या ‘जैसे थे’ निर्णयातील शिक्षक बदल्या 30 जूनपर्यंत

न्यायालयाच्या ‘जैसे थे’ निर्णयातील शिक्षक बदल्या 30 जूनपर्यंत 

कणकवली : जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या जिल्हय़ांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी 1 ते 31 मे या कालावधीत करण्यात येते. मात्र, जिल्हय़ांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी करताना उच्च न्यायालयाकडून काही जि. प. जिल्हांतर्गत बदल्यांबाबत पुढील आदेश होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले जातात. त्यामुळे विहीत कालमर्यादेत जिल्हय़ांतर्गत बदल्या करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशावेळी जैसे थे स्थितीचे आदेश उठल्यानंतर जिल्हय़ांतर्गत बदल्यांची अंमलबजावणी यावर्षी 31 मे ऐवजी 30 जूनपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले ओहत.