|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रेती,खडी वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई

रेती,खडी वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई 

प्रतिनिधी/ फोंडा

बेकायदेशीररित्या रेती, खडी व चिऱयांची वाहतूक करणाऱया वाहनांविरुद्ध खाण खात्याने धडक कारवाई सुरु केली असून काल बुधवारी ठिकठिकाणी एकूण 20 ट्रक जप्त करण्यात आले. केरी-सत्तरी, माशेल, होंडा, कुंकळी व पर्वरी याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

खाण खात्याचे तांत्रिक अधिकारी ऍन्थोनी लोपिस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सत्तरी वाहतूक खात्यातर्फे 3 खडीवाहू , माशेल येथे 2 खडीवाहू, होंडा येथे 1 खडीवाहू ,पर्वरी येथून 3 चिरेवाहू, 2 खडीवाहू व 1 रेती वाहू तसेच कुंकळी येथे 7 खडीवाहू व 1 चिरेवाहू वाहनाची मिळून एकूण 15 खडी, 1 रेती व 4 चिरेवाहू ट्रकांवर ही कारवाई करण्यात आली.

बेकायदेशीरपणे रेती, खडी व चिऱयांची वाहतूक करणाऱया अशा वाहनांवर यापुढेही अशाप्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खाण खात्याच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

 

Related posts: