|Thursday, September 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » नोकियाचे 3 स्मार्टफोन 13 जूनला होणार भारतात लाँच

नोकियाचे 3 स्मार्टफोन 13 जूनला होणार भारतात लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काही दिवसांपूर्वी नोकिया या कंपनीने नोकीया6, नोकिया 5 आणि नोकिया 3 हे स्मार्टफोन लाँच केले होते. हे तिन्ही स्मार्टफोन 13 जूनला भारतात लाँच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नुकताच नोकियाने 3310 हा फोन 3310रूपयात भारतात लाँच केला होता. नोकिया 3 स्मार्टफोनमध्ये 5 इंच स्क्रीन,7.0 नॉगट सिस्टम, गूगल फोटोज ऍपमध्ये अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज, डय़ुअल सिम व्हरिएंट, 2जीबी रॅम देण्यात आले आहे. नोकिया 5 स्मार्टफोनमध्ये 5.2 इंज स्क्रिन,फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल प्रंट कॅमेरा असे फिचर्स या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळातील.