|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हिंदू राष्ट्र जागृती दिंडी सावंतवाडीत

हिंदू राष्ट्र जागृती दिंडी सावंतवाडीत 

सावंतवाडी : हिंदू राष्ट्र व्हावे, यासाठी गुरुवारी सावंतवाडी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमुळे संपूर्ण शहर भगवामय झाले होते. ‘एकच लक्ष.. एकच राष्ट्र… हिंदू राष्ट्र’, ‘जय शिवाजी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदू राष्ट्र जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त सावंतवाडी शहरात भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले. श्री देव आत्मेश्वर मंदिर, उभाबाजार, गांधी चौक, मिलाग्रीस हायस्कूल, एस. पी. के कॉलेज, श्रीराम वाचनालय या मार्गावरून जात गवळी तिठा येथे दिंडीची सांगता करण्यात आली. या दिंडीत हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.