|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » leadingnews » शेतकऱयांकडून 5 जूनला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

शेतकऱयांकडून 5 जूनला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक 

ऑनलाईन टीम / अहमदनगर:

कर्जमाफी व हमीभावासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, येत्या 5 जून रोजी मुंबई वगळता ‘महाराष्ट्र बंद’ची हाक किसान क्रांती कोअर कमिटीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

1 जूनपासून शेतकऱयांनी संप पुकारला असून, भाजीपाला व दूधपुरवठा रोखण्यात आल्याने शहरांची कोंडी झाली आहे. दुसऱया टप्प्यात येत्या 5 जून रोजी शेतकऱयांकडून मुंबई वगळता ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. तर 6 जून रोजी सरकारी कार्यालयांना टाळे ठोकण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज रात्री शेतकऱयांना चर्चेला बोलावणे आले. तरीपण मागण्या मान्य होईपर्यंत बंद सुरुच राहणार असल्याचे शेतकऱयांनी सांगितले.

आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. संप म्हणजे शेतकऱयांनी शेतकऱयांसाठी उभी केलेली चळवळ आहे. त्यामुळे आरोप करून सरकारने आपले हसू करून घेऊ नये. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करत होते. पण, सरकारकडून दुर्लक्ष झाल्याने शेतकऱयांनी एक तारखेपासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला, याकडे लक्ष वेधण्यात आले.

 

Related posts: