|Friday, January 24, 2020
You are here: Home » Top News » अण्णांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव शेतकऱयांनी फेटाळला

अण्णांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव शेतकऱयांनी फेटाळला 

शिर्डी / प्रतिनिधी ः

राज्यभरातील शेतकरी संपाला दिशा देणाऱया किसान क्रांतीच्या शीर्ष समितीच्या पुणतांबा येथील बैठकीत अण्णा हजारेंच्या मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून, अण्णा हे भाजपचे समर्थक असल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी शुक्रवारी येथे केला.

शेतकरी संपाबाबत अण्णा हजारे हे किसान क्रांती व सरकार यांच्यात मध्यस्थी करायला तयार आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना किसान क्रांतीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी यांनी अण्णांच्या मध्यस्थीची गरज आम्हाला वाटत नाही. इतके दिवस ते कुठे होते, असा प्रश्न उपस्थित करीत आंदोलन सुरू झाले तेव्हा ते आले आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत होते, तेव्हा अण्णा कोणत्याही आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटायला गेले नाहीत. दुष्काळावर ते बोलले नाहीत. जसे मोदी आले, तसे अण्णा काहीही बोलले नाहीत. आम्हाला तर अण्णा हे शेतकऱयांचे नव्हे तर भाजपचे समर्थक आहेत, असे वाटते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला ते धावले आहेत. तसेच मध्यस्थी करायची होती, तर आमच्याशी चर्चा करायला पाहिजे. बऱयाच दिवसापासून अण्णा बाजूला पडले आहेत. ते या माध्यमातून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अण्णांची ही भूमिका म्हणजे बेगानी शादी मै, अब्दुल्ला दिवाना अशाच प्रकारची असल्याची टीका सूर्यवंशी यांनी केली.

आमची वकिली आम्हीच करू

आता आमचे आंदोलन जोर पकडत असून, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. अशावेळी आमची वकिली करण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी अनेकजण तयार आहेत. आम्ही सर्व शेतकऱयांची मुले आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही. तेव्हा आमची वकिली आम्हीच करू. आम्हाला कोणतीही मध्यस्थी, वकिली मान्य नसल्याचे सांगत अण्णांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला.

 

Related posts: