|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » सायना नेहवाल, बी.साई प्रणित उपांत्य फेरीत

सायना नेहवाल, बी.साई प्रणित उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था/ बँकॉक

येथे सुरु असलेल्या 120,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू बीसाई प्रणितने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत दुसऱया मानांकित सायना नेहवालने आगेकूच कायम राखताना उपांत्य फेरी गाठली आहे.

शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानी असलेल्या प्रणितने थायलंडच्या निमबतुर स्टेडियमला 21-16, 21-17 असे नमवताना सहजरित्या उपांत्य फेरी गाठली. 50 मिनिटे चाललेल्या या लढतीत प्रणितने प्रारंभापासून वर्चस्व गाजवताना निमबतुरला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. आता उपांत्य फेरीत प्रणितसमोर मलेशियाच्या सिकंदर झुकेरननचे आव्हान असणार आहे. महिला एकेरीतील लढतीत दुसऱया सायना नेहवालने संघर्षमय लढतीत जपानच्या हारुकी सुझुकीला 21-15, 20-22, 21-11 असे नमवताना थाटात उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या सायनाची थायलंडच्या चौथ्या मानांकित बुसाननशी होईल. याआधी सायनाने मलेशियाच्या यिंग यिंगला 21-11, 21-14 असे पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. सायना व प्रणित वगळता या स्पर्धेत इतर भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Related posts: