|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दुचाकी-कार अपघातात बालीका जागीच ठार

दुचाकी-कार अपघातात बालीका जागीच ठार 

महामार्गावर कुवे येथे भीषण अपघात

मामा-मामीसह परतणाऱया बालिकेवर काळाचा घाला

प्रतिनिधी /लांजा

महामार्गावर कुवे बागेश्री येथील अवघड वळणावर दुचाकी व ओमनी कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील 4 वर्षीय बालिका जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी झाले. शनिवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आह़े

स्वरा संदीप मोरस्कर (4, केळवली, त़ा राजापूर) असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव असून ती मामाच्या गावातून माघारी येत होती. या अपघातात प्रदीप पांडुरंग चव्हाण (30), रजनी प्रदीप चव्हाण (27), सुरेश गोविंद चव्हाण (48, सर्व ऱा वाकेड), भास्कर भाऊ वाजगे (40, ऱा बापार्डे, देवगड) हे चौघेजण गंभीर जखमी झाल़े प्रदीप चव्हाण व रजनी चव्हाण या पती-पत्नी असून स्वरा ही प्रदीप चव्हाण याची भाची आहे. स्वरा वाकेड येथे आजोळी आली होती. तिला घरी सोडण्यासाठी मामा-मामी दुचाकीवरुन लांजा शहराकडे येत असतानाच तिच्यावर काळाने झडप घातल़ी

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार वाकेड रोहीदासवाडी येथील प्रदीप चव्हाण हे पल्सर दुचाकीने (एम एच 08, ए एफ-7499) पत्नी रजनी व भाची स्वरा यांच्यासह लांजा शहराकडे येत होत़े लांजा शहराजवळील बागेश्री येथील वळणावर त्यांची दुचाकी आली असता मुंबईहून देवगडच्या दिशेने जाणाऱया ओमनी कारबरोबर (एम एच 03, ए आर-2484) समोरासमोर जोरदार धडक झाली. देवगड बापर्डे येथील भास्कर भाऊ वाजगे ही कार चालवत होते.

ही धडक एवढी जबर होती की दुचाकीचे हँडल तुटून पडले. तर प्रदीप, रजनी व स्वरा महामार्गावर फेकले गेले. रस्त्यावर जोराने आदळल्याने चव्हाण पती-पत्नीच्या डोक्याला व पायांना गंभीर इजा झाली. तर लहानग्या स्वराचा जागीच अंत झाला. कारचालकाच्या डोक्याला मार बसूत तो आतच अडकून पडला.

अपघाताची खबर मिळताच लांजा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक पंडीत पाटील, चालक देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल़ी गंभीर जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आह़े

Related posts: