|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » काबूल स्फोट मालिकेत 20 ठार

काबूल स्फोट मालिकेत 20 ठार 

काबूल :

 काबूलमध्ये शनिवारी दहशतवाद्यांकडून घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेत किमान 20 लोकांचा बळी गेला आहे. यात महिला व मुलांची संख्या जास्त आहे. दोन दिवसांपूर्वी येथील राजकीय नेत्याच्या मुलाचा सरकार विरोधी निदर्शनामध्ये मृत्यू झाला होता. या मुलाचा अंत्यसंस्कार सुरु असतानाच ही बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात आली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्यांपैकी अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काबूल शहरात कमालीचे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. पुत्र गमाविलेला स्थानिक नेता प्रबळ असल्यामुळे तो प्रतिस्पर्धी गटांवर सूड उगविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्य काळात आणखी हत्याकांडे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाने दिली. अफगाण सरकारचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला हे अंत्यविधीसाठी उपस्थित होते. तथापि त्यांना या स्फोटांमध्ये कोणतीही इजा झाली नाही.

Related posts: