|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदींचा अमेरिका दौरा होणारच

मोदींचा अमेरिका दौरा होणारच 

वॉशिंग्टन :

 पॅरिस पर्यावरण सुरक्षा करारातून बाहेर पडण्याची घोषणा करत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा बाधित होणार नाही, अशी ग्वाही अमेरिकेने दिली आहे. कोणत्याही एका मुद्यापेक्षा दोन देशांमधील संबंध अधिक व्यापक आहेत. गेल्या 10 वर्षांत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होत आहेत. ट्रम्प यांनी भारतावर केलेली टीका या संबंधांआड येणार नाही. भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक समान धागे असून जागतिक राजकारणात दोघांनाही महत्त्वाची भूमिका एकत्रितरित्या बजावावी लागणार आहे. यात दहशतवाद, इतर देशांचा वाढता विस्तारवाद, परस्पर व्यापार आणि गुंतवणूक संरक्षण सामुग्री व्यवहार अशा अनेक बाबींचा समावेश आहे. केवळ एका विषयावर मतभेद असले तरी त्यामुळे व्यापक संबंध आणि भागीदारी झाकोळली जाणार नाही, असे अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे.