|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » थ्री ज्वेल्स्चा पहिला टप्पा पूर्ण

थ्री ज्वेल्स्चा पहिला टप्पा पूर्ण 

प्रतिनिधी/ पुणे

पुण्यातील कोलते पाटील डेव्हलपर्स लि. या आघाडीच्या रियल एस्टेट कंपनीकडून सुरू असलेल्या ‘थ्री ज्वेल्स्’ या बांधकाम प्रकल्पातील पहिला टप्पा नियोजित वेळेत म्हणजेच 36 महिन्यांत पूर्ण झाला आहे. 

कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल सारडा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. संस्थेच्या विपणन विभागाच्या उपाध्यक्षा गायत्री कुंटे आणि विक्री विभागाच्या प्रमुख निधी श्रीवास्तव उपस्थित होत्या. पहिल्या टप्प्यामध्ये 0.73 दशलक्ष चौरस फुट इतके बांधकाम असून, त्यामध्ये 812 सदनिका आहेत. यामध्ये 1, 2 आणि 2.5 बीएचकेच्या सदनिका आणि 40 दुकानांचा समावेश आहे. पुण्यातील घर घेऊ इच्छिणारे आणि जवळच असणाऱया पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक शहरांतील नागरिकांकडून या प्रकल्पाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आगामी प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्यात 754 सदनिकांचा समावेश असून, हा टप्पा 0.75 दशलक्ष चौरस फूट इतक्या बांधकामाचा असेल. पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात 15 एकर जागेवर हा प्रकल्प उभा रहात असून, त्यात 1600 कुटुंबे राहू शकतील. या गेटेड कम्युनिटी प्रकल्पात आधुनिक जीवनशैलीच्या सर्व सुविधा आहेत.