|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » म्हाडाकडून मोदी चाळीच्या भूकर पाहणी

म्हाडाकडून मोदी चाळीच्या भूकर पाहणी 

मुंबई / प्रतिनिधी

अनेक वर्षांपासून पुनर्विकास रखडलेल्या आणि वादस्त ठरलेल्या शिवडीतील के. के. मोदी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील बिल्डरला अखेर म्हाडाने दणका देण्यास सुरुवात केली आहे. बिल्डरने सर्व नियम धाब्यावर बसवत पुनर्विकासाचा आराखडा तयार करत तो मंजूर करून घेतल्याच्या रहिवाशांच्या आणि बफहन्मुंबई भाडेकरू परिषदेच्या तक्रारीची अखेर म्हाडाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार 14 जून रोजी के. के. मोदी चाळीची भूकर पाहणी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यासंबंधीचे पत्र जारी केल्याची माहिती येथील रहिवासांनी दिली आहे.

19 वर्षांपासून मे. एम. बी. कन्स्ट्रक्शन या बिल्डरने मोदी चाळीचा पुनर्विकास रखडवला आहे. हा पुनर्विकास मार्गी लागावा आणि आपल्याला हक्काचे घर मिळावे यासाठी तिथले रहिवासी म्हाडाच्या पायऱया झिजवत आहेत. दुसरीकडे न्यायालयीन लढाईही रहिवाशांनी लढली. त्यात त्यांना यशही आले. पण न्यायालयाच्या आदेशाचेही पालन हा बिल्डर करताना दिसत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. त्याचवेळी मोदी चाळीच्या पुनर्विकासाचा आराखडा बिल्डरने तयार केला. इतकेच नाही तर त्याने पालिकेची मंजुरीही मिळवून घेतली आहे. पण तो आराखडा चुकीचा असून त्यात अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत रहिवाशांनी याबाबतही म्हाडाकडे तक्रार केली होती.

या आराखडय़ानुसार डोंगर भाग पोखरून इमारत बांधली जाणार आहे, तर इमारतीच्या बाजूने अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी आवश्यक ती जागा सोडण्यात आलेली नाही. त्यातच प्रकल्पाच्या बाजूलाच टाटा पॉवरच्या लाईन्स जातात. नियमाप्रमाणे 30 मीटरची जागाही सोडण्यात आलेली नाही. असे असताना पालिकेने या आराखडय़ाला मंजुरी कशी दिली? असा प्रश्न तिथल्या रहिवाशांनी उपस्थित करत या आराखडय़ाविरोधात तक्रार केली होती. एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीत दुरुस्ती मंडळाने या तक्रारीची दखल घेत जागेची भूकर पाहणी करण्याचे आदेश दिले होते. पण ही पाहणी काही होत नव्हती. त्यामुळे हा विषय रहिवाशांनी लावून धरला आणि अखेर मंडळाने14 जूनला ही पाहणी लावली.

Related posts: