|Sunday, March 29, 2020
You are here: Home » उद्योग » आरबीआय आज जाहीर करणार पतधोरण

आरबीआय आज जाहीर करणार पतधोरण 

रेपोदरात कपात करण्याची शक्यता कमी

वृत्तसंस्था/ मुंबई

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीच्या दोन दिवसीय बैठकीला बुधवारपासून प्रारंभ झाला. मध्यवर्ती बँकेकडून रेपोदरात कोणताही बदल करण्यात येणार नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र महागाई नियंत्रणात असल्याने रेपो दरात कपात करावी असे सरकारने म्हटले.

गेल्या तिमाहीत विकास दर घसरल्याने व्याजदरात सवलत देण्यात यावी असे व्यापार क्षेत्राचे म्हणणे आहे. पुढील महिन्यापासून जीएसटी लागू करण्यात येणार असल्याने महागाईवर नियंत्रण मिळविणे हे आव्हान असणार आहे. यामुळे आरबीआयकडून आपल्या द्वैमासिक बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात येणार नाही असे तज्ञांचे मत आहे. गेल्या आठवडय़ात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गव्हर्नर पटेल यांची भेट घेतली होती.

गेल्या काही महिन्यांपासून महागाई नियंत्रणात आहे. याचप्रमाणे अपेक्षेप्रमाणे मान्सून होण्याचा आणि तेलाच्या किमती न वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरबीआयने रेपो दरात कपात करावी असे अर्थमंत्र्यांनी म्हटले होते.

देशाचा विकास आणि गुंतवणुकीत वाढ होणे अपेक्षित आहे. सध्या देशातील समाधानकारक परिस्थिती पाहता कोणताही अर्थमंत्री रेपो दरात कपात करण्याची अपेक्षा करेल असे त्यांनी म्हटले होते. याउलट आता आरबीआयकडून रेपो दराविषयी कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. जुलैपासून लागू होणाऱया जीएसटीने महागाई आणि आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम होईल याचा आरबीआयकडून विचार करण्यात येईल असे सांगण्यात येते.

Related posts: