|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » एच-1बी व्हिसात 37 टक्के घसरण

एच-1बी व्हिसात 37 टक्के घसरण 

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

2016 मध्ये भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सात कंपन्याच्या एच-1बी व्हिसात 37 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाकडून भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे एच-1बी व्हिसाच्या आधारे अमेरिकेत जाणाऱयांत घट झाली आहे.

2015 वर्षाच्या तुलनेत 2016 मध्ये भारतीय तंत्रज्ञांना व्हिसा देण्यासाठीचे नवीन 5,436 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. हे प्रमाण 37 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. 2016 मध्ये एच-1बी व्हिसासाठी भारतातील आयटी कंपन्यांकडून 9,356 अर्ज करण्यात आले होते. अमेरिकेतील कंपन्यांच्या कामगारांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 0.006 टक्के आहे. टीकाकारांकडून नेहमीच रोजगारकपातीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 10 हजारपेक्षा कमी कर्मचारी 160 दशलक्ष कर्मचारी असणाऱया अर्थव्यवस्थेला आधार देतात असे म्हणणे चुकीचे ठरेल असे नॅशनल फाऊंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसीमध्ये म्हणण्यात आले. अमेरिकेच्या व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱया कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

टीसीएसच्या व्हिसांमध्ये 2016 मध्ये 2015 च्या तुलनेत 56 टक्क्यांनी घसरण झाली. 2015 मध्ये 4,674 व्हिसा देण्यात आले होते, 2016 मध्ये ही संख्या घसरत 2,040 वर पोहोचली. विप्रोसाठी 52 टक्के घसरण झाली. 3,079 व्हिसांवरून ही संख्या 1,474 वर पोहोचली. इन्फोसिसच्या व्हिसा प्रमाणात 16 टक्क्यांनी घसरण झाली. 2015 च्या 2,830 व्हिसांवरून 2016 मध्ये 2,376 व्हिसा मंजूर करण्यात आले होते.

Related posts: