|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत शासकिय योजना पोहचवणार : रोहिणी

समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत शासकिय योजना पोहचवणार : रोहिणी 

प्रतिनिधी/ गारगोटी

समाजातील प्रत्येक घटकांपर्यत शासकिय योजना पोहचवुन मतदार संघात विकासाचा नवा अध्याय सुरू करणार आहोत, असे प्रतिपादन पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्य़ा सै. रोहिणी अर्जुन आबीटकर यांनी केले.

भुदरगड पंचायत समितीत  ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद व प्राचार्य अर्जुन आबीटकर यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या नाभिक व्यवसायीकांच्या मेंझर मशिन वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. सरिता वरंडेकर होत्या.

सौ. आबीटकर म्ह्णाल्या की, आमदार प्रकाश आबीटकर व माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबीटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये  विकासाच्या नवनविन संकल्पना राबवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. माजी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य आबीटकर म्ह्णाले की, गेली पाच वर्षे जिल्हा परिषदच्या व्यक्तीगत लाभाच्या विविध योजना खेचुन आणल्या आहेत.

यावेळी उपसभापती अजित देसाई सदस्य सुनिल निंबाळकर, सदस्या स्नेहल परिट, धनाजी खोत, संदिप वरंडेकर, बबन निळपणकर, सहाय़क गटविकास अधिकारी कोंडेकर यांच्यासह लाभार्थी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित हेंते. प्रास्ताविक विद्याधर परिट यांनी तर आभार साताप्पा कल्याणकर यांनी मानले.