|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शेतकऱयांच्या केसालाही धक्का लागु देणार नाही : आमदार आबीटकर

शेतकऱयांच्या केसालाही धक्का लागु देणार नाही : आमदार आबीटकर 

प्रतिनिधी/ गारगोटी

गारगोटी शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असुन सामान्य शेतकऱय़ांच्या जमिनी घरे यांचे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होऊ देणार नाही. प्रादेशिक आराखडा तयार करताना शेतकऱय़ांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले.

गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातुन करण्यात आलेल्या रस्त्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सरिता चिले होत्या.

माजी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य अर्जुन आबीटकर म्ह्णाले, गारगोटी शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात आम्ही सरस ठरलो असुन उर्वरित रस्तेही डांबरिकरन करणार आहोत. यावेळी अंकुश चव्हाण, सदाशिव खेगडे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमास बाजीराव चव्हाण, शिवाजी मुगडे, प्रल्हाद आबीटकर, दिलिप परिट, सुरेश बेलेकर, रंगराव मुगडे, दत्तात्रय भिलुगडे, नामदेव सावंत, अशोक डेंगे, प्रकाश मोरे, दत्तात्रय तेली, संजय मुगडे, महेश सुतार, सौ. राजश्री शिंदे, सौ, गिता मोरे, छाया सारंग, रूपाली राऊत, रणधिर शिंदे, ग्रामविकास अधिकारी जे. ए. बुवा यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते, स्वागत व प्रास्ताविक सर्जेराव मोरे यांनी केले, तर आभार अरूण शिंदे यांनी मानले.

Related posts: