|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नागालँडमध्ये तीन उग्रवाद्यांचा खात्मा

नागालँडमध्ये तीन उग्रवाद्यांचा खात्मा 

एक जवान हुतात्मा, आसाम रायफल्सची कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नागालँडमधील मोन जिल्हय़ामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये तीन उग्रवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी उडालेल्या चकमकीमध्ये आसाम रायफल्सचा एक अधिकारी हुतात्मा झाला. तर तीन जवान जखमी झाले आहेत. मारलेले उग्रवादी हे नॅशनल सोशालिस्ट कांऊसिल ऑफ नागालँड एनएससीएन के या संघटनेशी संबंधित आहेत. या गोळीबारामध्ये एक नागरिकही ठार झाला आहे.

मंगळवारी रात्री उशीरा काही उग्रवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार टिजिट सर्कलमधील लप्पा येथे ही चकमक उडाली. यामध्ये आसाम रायफल्सचा एक अधिकारी हुतात्मा झाला आहे. एनएससीएन के चे काही उग्रवादी या परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिम सुरू केली होती. त्यावेळी उग्रवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तीन तासांहून अधिक काळ चालेल्या या चकमकीमध्ये तीन उग्रवाद्यांना सेनादलाच्या जवानांनी कंठस्नान घातले.