|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ओटवणेवासीयांचा वीज अधिकाऱयांना जाब

ओटवणेवासीयांचा वीज अधिकाऱयांना जाब 

ओटवणे : ओटवणे गावात गेले पंधरा दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने याकडे लक्ष वेधूनही वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने संतप्त ओटवणेवासीयांनी बुधवारी दुपारी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता अमोल राजे आणि शाखा अभियंता विवेक मसराम यांना धारेवर धरत जाब विचारला.

खंडित वीजपुरवठय़ाबाबत संतप्त ग्रामस्थांनी वीज अधिकाऱयांवर प्रश्नांची सरबत्ती करून बोलतीच बंद केली. विजेच्या तक्रारींचा पाढा वाचतानाच ग्राहकांच्या हिताकडे लक्षच नसल्याचा आरोप केला. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱयांनी शांत राहणे पसंत केले. ग्रामस्थांनी विजेअभावी सामोरे जाव्या लागणाऱया समस्या मांडून याचे खापर अधिकारी वर्गाच्या बेजबाबदारपणा व कामचुकारपणावर फोडले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर येत्या आठ दिवसात ओटवणेतील विजेच्या तक्रारी सोडवून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन राजे यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. ग्रामस्थांनी आठ दिवसात वीजपुरवठा सुरळीत न केल्यास पुन्हा संपूर्ण गावाच्यावतीने आंदोलन छेण्याचा इशारा दिला.

यावेळी सरपंच संतोष कासकर, उपसरपंच रवींद्र म्हापसेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रवींद्र गावकर, ग्रामपंचायत सदस्य उमेश गावकर, सोनू दळवी, गुंडू जाधव, सगुण गावकर, अनंत तावडे, पोलीस पाटील शेखर गावकर, संतोष तावडे, रमेश वरेकर, प्रकाश केळुसकर, मनोहर मयेकर, राजन तारी, संतोष नाईक, सिद्धेश म्हापसेकर, गंगाराम वारंग, रामा बांधकर, चंद्रकांत म्हापसेकर, गुरू बुराण, तात्या गावकर, मंगेश चिले, किरण गावकर उपस्थित होते.