|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » के.शशीकिरण विजेता

के.शशीकिरण विजेता 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा ग्रँडमास्टर कृष्णन शशीकिरणने दहा फेऱयांत 6.5 गुण मिळवित व्हराडेरो, क्मयुबा येथे झालेल्या 52 व्या कॅपाब्लँका मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळविले. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू आहे.

दहाव्या व शेवटच्या फेरीत शशीकिरणने क्युबाच्या इसान रेनाल्डो ओर्टिझ सुआरेझविरुद्ध झटपट बरोबरी साधत जेतेपद निश्चित केले. अग्रमानांकित युपेनच्या व्हॅसिली इव्हान्चुकने शांकलँडसह 5.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. इव्हान्चुकविरुद्धचे दोन्ही डाव शशीकिरणने बरोबरीत सोडविले तर सॅम्युएल शांकलँड, कॅस्पर पिओरन, एमिलिओ कोर्डोव्हा यांच्याविरुद्ध एकेक डाव जिंकले. दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत शशीकिरण अपराजित राहिला. त्याने एकूण 3 विजय मिळविले आणि सात डाव अनिर्णीत राखले. इव्हान्चुकने ही स्पर्धा सातवेळा जिंकली आहे. क्मयुबातील ही सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.