|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग » आयटी, बँक समभागात विक्रीने घसरण

आयटी, बँक समभागात विक्रीने घसरण 

बीएसईचा सेक्सेन्स 58, एनएसईचा निफ्टी 17 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

शुक्रवारी भांडवली बाजारात घसरण दिसून आली. सुरुवातीला बाजारात चांगली तेजी आली होती. मात्र अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी घसरत बंद झाले. दिवसातील व्यवहारादरम्यान सेक्सेक्स 31,354 आणि निफ्टी 9,688 पर्यंत पोहोचले होते. गुरुवारी औषध कंपन्यांच्या समभागात पुन्हा तेजी आली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात किंचित खरेदी झाली होती. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारत 14,834 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांच्या तेजीने 15,472 वर बंद झाला.

बीएसईचा सेन्सेक्स 58 अंशाने घसरत 31,213 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 17 अंशाने घसरत 9,647 वर बंद झाला.

आयटी, पीएसयू बँक, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, तेल आणि वायू समभागात विक्री दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1.4 टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक 0.9 टक्क्यांनी घसरले. बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.6 टक्के, भांडवली वस्तू निर्देशांक 0.4 टक्के आणि तेल आणि वायू निर्देशांक 1.4 टक्क्यांची कमजोरी आली.

बँक निफ्टी 0.15 टक्क्यांनी घसरत 23,536 वर बंद झाला. औषध, धातू आणि ऊर्जा समभागात खरेदी झाली. निफ्टीचा औषध निर्देशांक 2 टक्के आणि धातू निर्देशांक 0.9 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा ऊर्जा निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारला.

दिग्गज समभागांची कामगिरी

डॉ. रेड्डीज लॅब, सन फार्मा, एचडीएफसी, टाटा मोटर्स डीव्हीआर, सिप्ला आणि टाटा स्टील 3.8-1.6 टक्क्यांनी वधारत बंद झाले. टीसीएस, गेल, आयओसी, एशियन पेन्ट्स, हीरो मोटो आणि आयसीआयसीआय बँक 3.6-1.4 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात पेज इन्डस्ट्रीज, एमआरएफ, एबीबी इंडिया, जेएसडब्ल्यू एनर्जी आणि बायोकॉन 5.25-2.7 टक्क्यांनी वधारत बंद झाले. स्मॉलकॅप समभागात ऑर्बिट कॉर्प, सुप्रीम इन्फ्रा, शिवम ऑटो, एसटीसी इंडिया आणि जेनबर्क्ट फार्मा 20-14.4 टक्क्यांनी मजबूत झाले.

मिडकॅप समभागात व्हिडिओकॉन, ओरिएन्टल बँक, पेट्रोनेट एलएनजी, भारत फोर्ज आणि युनियन बँक 4.9-2.1 टक्क्यांनी घसरले. स्मॉलकॅप समभागात दीप इन्डस्ट्रीज, लॉयड इन्डस्ट्रीज, फिनिक्स लॅप्स, सुप्राजित इंजीनियरिंग आणि जीओसीएल कॉर्प 11.6-5.2 टक्क्यांनी घसरत स्थिरावले.

Related posts: