|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » विविधा » 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलणार

16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पेट्रोल आणि डिझेल खरेदीबाबत तेल कंपन्यांनी मोठी घोषणा केली आहे.देशात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार आहेत. तीन सरकारी तेल कंपन्यांनी या आपल्या जुन्या मागणीवर शिक्कामोर्तेब केले आहे.

इंडियान ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रगेलियम या महत्त्वाच्या कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाच्या व्यवहारात जास्त पारदर्शकता यावी, दरातील चढ – उताराचा ग्राहकांना फटका बसू नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे ऑईल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. दररोज बदलणारे पेट्रोल आणि डिझेलो दर एसएमएस द्वारे सर्वांना कळवण्याचा पेट्रोल कंपन्यांचा विचार आहे. 1 मे पासून उदयपूर, जमशेदपूर,पदुदचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत ऑईल कंपन्यांकडून दररोज किंमती बदलण्याचा प्रयोग सुरू आहे. ज्याची आता देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे.