|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दृष्टीदानात सोलापूर जिल्हा अव्वल

दृष्टीदानात सोलापूर जिल्हा अव्वल 

जाकिरहुसेन पिरजादे/ सोलापूर

मानवी शरीराच्या विवध अवयवामध्यें मूत्रपिंडदान, यकृतदान, त्वचादान, रक्तदान आणि देहदान इ. दान मनुष्य करू शकतो. यासर्वामध्ये नेत्रदान हे एक श्रेष्ठ आणि पवित्र आहे. नेत्रदान ही काळाची गरज असून त्यामुळे अंध व्यक्तींना डोळे मिळू शकतात. दृष्टीदानात महाराट्र राज्यातून सोलापूर जिल्हा अव्वल असून याठिकाणी प्रतिवर्षी 100 जण दृष्टीदान करीत असतात.  

 

   शनिवार 10 जून हा दिवस उस्मानाबाद येथील डॉ. भालचंद्र यांच्यानावाने जागतिक दृष्टीदान †िदन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी उस्मानाबादमध्ये सिव्हील सर्जन, नेत्रालय चिकीत्सक म्हणून काम केले पाहिले. जनजागृतीचे हजारो पॅप्म घेतले आहेत. नेत्रदानाविषयी जनजागृती त्यांनी केली. त्यांचे कार्य बहूमोल आहे त्यामुळे हा दिन त्यांच्या नावाने जागतिक दृष्टीदान †िदन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे सर्वानी दृष्टीदान करण्याचे संकल्प करावा आणि डोळसपणे दृष्टीदान करावे, असे मत श्रीमती मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल नेत्रपेढीचे डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी जागतिक दृष्टी†िदनी तरूण भारत संवादशी बोलताना सांगितले.

1988 साली शाम तोष्णीवाल, डॉ. अल्बाम यांनी दृष्टीदान चळवळ विषयी कामे केली. मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल यांनी या नेत्रपेढीची सुरूवात केली.  त्याकाळी सुरूवातीला 4 ते 5 डोळे †िमळायचे आजच्या काळात तब्बल 120, ते 130 पर्यंत डोळे मिळत असल्याचे डॉ. तोष्णीवाल यांनी सांगितले. नातेवाईकांनी आपल्या इच्छेनुसार डोळे दान करणे गरजेचे आहे त्यामुळे एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकते. आज कोणीही आपल्या डोळयाची निगा राखत नाही. आज 100 लोकापैकी 15 जणांना मधूमेहाचा आजार जडतो. या रुगणांना असे वाटते की आपणास डोळयांनी व्यवस्थीत किंवा चांगले दिसते तरी त्यांनी डोळयाची (अंतरपटल)तपासणी करून घेण्याची गरज आहे.

 जर आपण दृष्टीदान करण्याचा संकल्प केल्यास दृष्टीदान केल्यास अंध व्यक्तींना एक नवीन जीवन देवू शकतो. त्यामुळे सर्वानी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा आणि ज्यांना गरज आहे त्यांना दृष्टी मिळेल. नेत्रदान करा जेणेकरून ही चळवळ पुढे गेली पाहिजे, अशी इच्छा डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी व्यक्त केली.

नेत्रपेढीकडून मरणोत्तर नेत्रदान संमतीपत्रकारवर आपली माहिती भरून सही करून घ्यावी. मरणोत्तर नेत्रदान केलेल्या बदल्यात कोणताही आर्थिक मोबदला त्यांच्या वारसाना दिला जात नाही. नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांला कोणत्याही लाभार्थी अंध व्यक्तीचे नाव निर्देशन करता येत नाही. एखाद्याचा मुत्यू झाल्यास 4 ते 6 तासात डोळे काढले जातात. 24 ते 72 तासात डोळे बसविले जातात.

 मागील 7 वर्षात 697 जणांनी केले नेत्रदान

नेत्रदान केलेल्यांची आकडेवारी मध्ये सर्वात जास्त लातूर, उस्मानाबाद या जिल्हयातील लोकांनी केले नेत्रदान. सन 2010-11 मध्ये 104, 2011-12 मध्ये 125, 2012-13 मध्ये 126, सन 2013-14 मध्ये 132, 2015-16 मध्ये106, 2016-17 मध्ये 95 असे एकूण 7 वर्षात 697 जणांनी नेत्रदान केले आहे.

Related posts: