|Sunday, October 13, 2019
You are here: Home » leadingnews » सुकाणू समितीची आज बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार

सुकाणू समितीची आज बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेतकऱयांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सुकाणू समितीमध्ये आज आंतर्गत चर्चा होणार आहे. सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने सुकाणू समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. मात्र, गिरीधर पाटील यांच्या या चर्चेला नकार आहे. त्यामुळे सुकाणू समितीमध्ये मतभेद आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राजू शेट्टी, बच्चू कडू आणि इतर सदस्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि मंत्रिगटासोबतच्या चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र गिरीधर पाटील यांनी त्याला विरोध केला आहे. त्यामुळे आता चर्चा होणार की आणखी काही वाद सुरू होणार हे पहावे लागणार आहे.