|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » आक्षेप असल्यास मी सुकाणू समितीतून बाहेर पडायला तयारः राजू शेट्टी

आक्षेप असल्यास मी सुकाणू समितीतून बाहेर पडायला तयारः राजू शेट्टी 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सुकाणू समितीच्या नाशिकमधील बैठकीचा सूर पाहता, मी आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे म्हणणे होते. पण, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मी तयारी दाखविली. मात्र, अजूनही काहींना आक्षेप असेल, तर मी बाहेर पडायला तयार आहे, अशी भूमिका सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी घेतली.

शेट्टी म्हणाले, सरकारला आम्ही दोन दिवसांचा अवधी दिला होता. त्याचसोबत सरकारडून निमंत्रण आल्याचे मला माहिती नाही. सरकारसोबत बैठक झाल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू. मात्र, त्याआधी समितीतल्या काही लोकांनी घाई गडबडीत भूमिका मांडणे चुकीचे आहे.

माझ्याकडे सूत्र आणि अजित नवलेंकडे समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा. मात्र, इतरांना जर चर्चेला जायचे असेल, तर मी माझे नाव मागे घ्यायला तयार आहे, असेही शेट्टींनी नमूद केले.

राजकीय पक्षाचा आहे म्हणून जर मला विरोध असेल तर एक लक्षात घ्या की मला या सरकारशी काही देणे-घेणे नाही. मी माझे सरकारविरोधात आंदोलन लढतो आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.