|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाकिस्तान लष्करप्रमुख बाजवांची नवी दर्पोक्ती

पाकिस्तान लष्करप्रमुख बाजवांची नवी दर्पोक्ती 

कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्यास सज्ज

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तान काश्मिरींना समर्थन देणे सुरूच ठेवणार आहे. पाक लष्कर कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी शनिवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या नजीक असणाऱया मुजफ्फराबाद सेक्टर येथे केले आहे.

एलओसीच्या दोन्ही बाजूला राहणाऱया काश्मिरींनी भारताच्या अत्याचारांनी भयभीत होऊ नये असे बाजवा यांनी म्हटले आहे. मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये बाजवा यांनी सैनिकांशी संवाद साधत कोणताही भारतीय साहस दाखवत असेल तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल अशी दर्पोक्ती केली.

वक्तव्याची पार्श्वभूमी महत्त्वपूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी कजाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे गेले होते. दोन्ही देशांना यावेळी एससीओचे सदस्यत्व मिळाले असून यावेळी नवाज यांनी भारताचा 2 वेळा उल्लेख करत अभिनंदन पेले. शरीफ यांच्यासोबत एका अनौपचारिक भेटीत मोदींनी त्यांचे आरोग्य आणि आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

भारतीय लष्करप्रमुखांचे वक्तव्य

8 जून रोजी भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांन चीन-पाकिस्तान समवेत देशाच्या अंतर्गत शत्रूला एकाचवेळी सामोरे जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. काश्मीरमधील स्थिती लवकरच सुधारेल, पाकिस्तानची माध्यमे दुष्प्रचार राबवून काश्मीरच्या युवकांना भडकावित असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Related posts: