|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » डेहराडूनजवळ हेलिकॉप्टर कोसळले

डेहराडूनजवळ हेलिकॉप्टर कोसळले 

वृत्तसंस्था/ डेहराडून

भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उड्डाणानंतर थोडय़ाच वेळात कोसळल्याने झालेल्या अपघातामध्ये चालक दलातील अभियंता ठार झाला. तर अन्य दोन पायलट जखमी झाले. हेलिकॉप्टरमधील सर्व पाचही भाविक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. चमोलीच्या पोलीस अधीक्षक तृप्ती भट यांनी या अपघाताची माहिती दिली. विक्रम लांबा असे मृत अभियंत्याचे नाव असून हेलिकॉप्टरच्या पात्यांमध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ते आसाममधील आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे मुंबईतील खासगी विमान वाहतूक सेवा क्रिस्टर एविएशन कंपनीचे होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.

हे हेलिकॉप्टर गुजरातमधील भाविकांना घेऊन बद्रिनाथहून हरिद्वारकडे निघाले होते. तथापि हवेच्या योग्य दाबाअभावी उड्डाणानंतर थोडय़ाच वेळात हेलिकॉप्टरमध्ये बिघाड निर्माण झाला. शनिवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पायलट संजय वासी यांच्या पाठीला तर सहपायलट अलका शुक्ला या किरकोळ जखमी झाल्या.

Related posts: