|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » बेथनी-सफारोव्हाचे सलग तिसरे जेतेपद,

बेथनी-सफारोव्हाचे सलग तिसरे जेतेपद, 

मायकेल व्हीनस-रेयान हॅरिसन पुरुष दुहेरीत यशस्वी

वृत्तसंस्था/ पॅरिस

अमेरिकेची बेथनी मॅटेक सँड्स व झेकची लुसी सफारोव्हा यांनी सलग तिसरे ग्रँडस्लॅम अजिंक्मयपद मिळविताना फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत या अग्रमानांकित जोडीने ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टी व कॅसी डेलाक्वा यांचा पराभव केला. पुरुष दुहेरीत मायकेल व्हीनस व रेयान हॅरिसन यांनी पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.

बेथनी-सफारोव्हा यांनी याआधी 2016 मधी अमेरिकन ओपन व या वषी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतही जेतेपद मिळविले आहे. त्यांनी बार्टी-डेलाक्वा यांचा 6-2, 6-1 असा सहज पराभव केला. चारही ग्रँडस्लॅम अजिंक्मयपदे मिळविण्यासाठी त्यांना आता विम्बल्डन स्पर्धा जिंकावी लागणार आहे. बार्टी-डेलाक्वा पहिले ग्रँडस्लॅम अजिंक्मयपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील होत्या. अंतिम फेरी गाठेपर्यंत त्यांनी शानदार प्रदर्शनही केले होते. पण जेतेपदाच्या लढतीत त्यांना संघर्षच करावा लागला. प्रत्येक सेटमध्ये तीनदा त्यांची सर्व्हिस ब्रेक झाली. बेथनीने मात्र प्रतिस्पर्ध्याचे कौतुक केले. ‘तुम्ही खरोखरच दर्जेदार प्रदर्शन केले असून तुम्ही एक उत्कृष्ट जोडी आहात. आमची पुन्हा लवकरच गाठ पडेल, याची मला खात्री वाटते,’ असे बेथनी म्हणाली. विजेत्या जोडीने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठेपर्यंत फक्त एक सेट गमविला. उपविजेत्या बार्टी-डेलाक्वा यांनी 2013 मध्ये तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. पण त्यावेळीही त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. ही कोंडी त्यांना येथील स्पर्धेतही फोडता आली नाही. बेथनी-सफारोव्हा यांनी 2015 मध्ये ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपदही मिळविले होते.

व्हीनस-हॅरिसन पुरुष दुहेरीत विजेते

Ryan Harrison of the U.S. and Michael Venus of New Zealand, left, hold the trophy after winning the men's doubles final match of the French Open tennis tournament against Santiago Gonzalez of Mexico and Donald Young of the U.S. in three sets 7-6 (7-5), 6-7 (4-7), 6-3, at the Roland Garros stadium, in Paris, France, Saturday, June 10, 2017. (AP Photo/Michel Euler)

पुरुष दुहेरीत मायकेल व्हीनस व रेयान हॅरिसन या न्यूझीलंड-अमेरिकन जोडीने अमेरिकेचा डोनाल्ड यंग व मेक्सिकोचा सांतियागो गोन्झालेझ यांचा पराभव करून पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. व्हीनस-हॅरिसन यांनी ही लढत 7-6 (7-5), 6-7 (4-7), 6-3 अशी जिंकली. व्हीनस तरुण असतानाच अमेरिकेत वास्तव्य करीत असून हॅरिसन व तो दोघे मिळूनच एकत्र टेनिस खेळत आहेत. हॅरिसनचे वडील पॅट त्यांचे प्रशिक्षक होते. व्हीनसचे ते आजही प्रशिक्षक आहेत. व्हीनस-हॅरिसन यांनी आतापर्यंत फक्त चार स्पर्धांत एकत्र खेळले आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी एस्टोरिल स्पर्धेत जेतेपद मिळविले होते.

Related posts: