|Sunday, October 13, 2019
You are here: Home » leadingnews » नीट परिक्षेचे निकाल जाहीर करा, सुप्रिम कोर्टाचे आदेश

नीट परिक्षेचे निकाल जाहीर करा, सुप्रिम कोर्टाचे आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

वैद्यकिय आणि दंतवैद्यकिय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल 26 जून आधी जाहीर करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. निकालाला स्थगिती देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. नीट परीक्षा घेणा-या सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 26 जूनपर्यंत निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितले.

मद्रास हायकोर्टाने नीट परिक्षेवर स्थगिती आणल्यानंतर केंद्र सरकारने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. केंद्र सरकारच्या याचिकेवर सुप्रि कोर्टात आज निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सुप्रिम कोर्टाने देशभरातील उच्च न्यायालयांना नीट संदर्भात याचिका दाखल करण्यास मनाई केली असून उच्च न्यायलयाने वैद्यकिय आणि दंतवैद्यकियेच्या प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेप करू नये असे देखील सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे.