|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » तथ्यहीन आरोप करणाऱयांवर कारवाई करण्याचे अधिकार द्या : निवडणूक आयोग

तथ्यहीन आरोप करणाऱयांवर कारवाई करण्याचे अधिकार द्या : निवडणूक आयोग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ईव्हीएममध्ये फेरफार करता येऊ शकतात, यांसारख्या तथ्यहीन आरोपांवर कारवाई करण्याचे अधिकार द्या, असे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केले. तसेच न्यायालयीन अवमानना अधिनियम 1971 मध्ये सुधारणा करुन निवडणूक आयोगाचे म्हणणे न ऐकणारे किंवा त्यांना सहकार्य न करणाऱयांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार मिळावेत, अशी मागणीही निवडणूक आयोगाने केली आहे.

केंद्रीय कायदा मंत्रालयाला जवळपास एक महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने पत्र लिहिले होते. या पत्राचा विचार सध्या कायदा मंत्रालयाकडून केला जात आहे. देशातील निवडणूक आयोग त्यांची प्रतिमा खराब करणाऱयांविरोधात कारवाई करु शकतात, असे मत आयोगाचे आहे. राजकीय पक्षांकडून सातत्याने निवडणूक आयोगावर आरोप करण्यात येत आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये निवडणूक आयोगाकडे आरोप करणाऱयांविरोधात कारवाई करण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यामुळे अशाप्रकारचा आरोप करणाऱयांवर कारवाई करण्यात यावी, असे अधिकार निवडणूक आयोगाला मिळावेत, अशी मागणी आयोगाने केली आहे.