|Sunday, August 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘कच्च लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

‘कच्च लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

अभिनेता प्रसाद  ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ या आगामी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात मनमीत पेम याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गेल्यावर्षी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. प्रसादने त्याच्या इन्सटाग्राम अकाऊंटवरून या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले.

ब्लॅक ऍण्ड व्हाइटमध्ये असणाऱया या पोस्टमध्ये सोनाली आणि रवी चेहऱयावर गंभीर भाव दिसत आहेत. तर मागे उभे असलेले सचिन मात्र थोडेसे हसताना दिसतायेत. मनमीतचीही या पोस्टरमध्ये झलक पाहावयास मिळते. एका महत्त्वपूर्ण विषयावर हा सिनेमा भाष्य करतो असे प्रथमदर्शनी या सिनेमाच्या पोस्टरकडे पाहून दिसते.पण सिनेमाची कथा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पोस्टरवरील मनमातीची झलक पाहता तो यात गतीमंद मुलाच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे.