|Sunday, October 13, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यांनी स्वबळावर निधी उभारावा ; कर्जमाफीवर जेटलींचे मत

राज्यांनी स्वबळावर निधी उभारावा ; कर्जमाफीवर जेटलींचे मत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील ज्या राज्यांनी शेतकऱयांना कर्जमाफी दिली आहे, अशा राज्यांनी स्वबळावर कर्जमाफीसाठी निधी उभारावा केंद्रावर अवलंबून राहू नये, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारने काल (रविवारी) शेतकऱयांना तत्त्वतः कर्जमाफी दिली आहे. जेटली म्हणाले, ज्या राज्यांना शेतकऱयांना कर्जमाफी द्यायची आहे, त्यांनी उत्पन्नाचे मार्गही शोधावेत. राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी दिली गेल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवर 1.14 लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तसेच अल्पभूधारक शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी 30 हजार कोटी बँकांना द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ज्या राज्यांनी शेतकऱयांना कर्जमाफी दिली आहे, त्या राज्यांनी निधी उभारावा, असेही जेटली म्हणाले.