|Sunday, October 13, 2019
You are here: Home » leadingnews » कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकऱयांना 10 हजार रुपये मिळणार

कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकऱयांना 10 हजार रुपये मिळणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत बी-बियाणे खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये द्या, अशी मागणी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतचा ठराव मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी रावते यांनी शेतकऱयांना बी-बियाणे खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली आहे. शेतकऱयांना कर्जमाफी देताना ही रक्कम कमी करुन द्यावी, असा ठराव रावते यांनी मांडला. हा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे.