|Saturday, October 19, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » पाचशे रूपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात !

पाचशे रूपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच पाचशे रूपयाची नवी नोट बाजारात आणणार आहे. जुन्या 500 नोटा देखील चलनात असणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. इंडिया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

पाचशे रूपयांच्या नव्या नोटांवर ए हे इनसेट अक्षर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनातुन बाद झाल्या होत्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतल जारी केलेल्या पाचशे रूपयांच्या नोटा चलनात कायम राहणार आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाचशे रूपयांच्या नव्या नोटा नव्या मालिकेतील असतील.