|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सून जैसे थे

मान्सून जैसे थे 

पुणे / प्रतिनिधी

नैत्य मोसमी वारे ‘जैसे थे’ असून, पुढील 48 तासांत मान्सून विदर्भासह, मध्य प्रदेश, झारखंडचा काही भाग आणि गुजरातच्या आणखी काही भागात प्रवेश करण्यास स्थिती अनूकुल आहे. पुढील 24 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.

मान्सूनने अर्ध्यावर महाराष्ट्र व्यापला आहे. मराठवाडय़ाच्या काही भागासह विदर्भाला मान्सूनची प्रतीक्षा आहे. राज्याच्या काही भागांत मंगळवारी पावसाची नोंद झाली. सायंकाळपर्यंत रत्नागिरी 0.3, अलिबाग 0.2, अमरावतीत 11, तर नागपुरात 20 मिमी पाऊस झाला. येत्या 15 व 16 जूनला कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट, तर मराठवाडय़ाच्या काही भागात किंचित घट झाली आहे.

Related posts: