|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » झारखंडमध्ये खाणींना आग, 19 रेल्वेफेऱया बंद

झारखंडमध्ये खाणींना आग, 19 रेल्वेफेऱया बंद 

रांची / वृत्तसंस्था

झारखंडच्या धनबाद ते चंद्रपूर दरम्यानच्या खाणींना लागलेल्या आगीमुळे 35 किलोमीटरच्या रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. रेल्वेनुसार 15 जूनपासून लागू होणाऱया निर्णयाचा प्रभाव 19 रेल्वेगाडय़ांवर पडणार आहे. तसेच यामुळे रेल्वेला 2750 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोळसा कंपन्या आणि कोळसा सचिवांशी रेल्वे अधिकाऱयांची बोलणी सुरू आहेत. कोळसा वाहतुकीचा मार्ग बदलून जवळपास 1500 कोटी रुपयांचे उत्पन्न वाचविण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. 1.5 कोटी टन कोळसा दुसऱया ठिकाणावरून उचलत मालवाहतुकीतील तोटा 1000 कोटीपर्यंत आणता येईल असे रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सांगितले.

1.25 कोटी प्रवासी प्रभावित

जमेशद यांच्यानुसार या मार्गावर 13 मेल एक्स्प्रेस आणि 6 पॅसेंजर रेल्वे रद्द केल्या जातील. या गाडय़ांमधून वर्षभरात प्रवास करणाऱया 1.25 कोटी प्रवाशांवर प्रभाव पडणार आहे.

4 राज्यांमध्ये वाढणार वीज संकट

पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील अनेक ऊर्जा प्रकल्पांना कोळसा मिळू शकणार नाही. यामुळे या राज्यांमध्ये वीज संकट निर्माण होऊ शकते. या राज्यांना कोळशाचा पुरवठा झरिया (धनबाद) येथूनच केला जातो.

नव्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव

रांची क्षेत्रातील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मनोज कृष्ण अखौरी यांच्यानुसार नव्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा रेल्वेमार्ग 42 किलोमीटर लांब असेल. याच्या निर्मितीसाठी 4 वर्षे लागणार असून 3200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

कशी लागली आग

सर्वात आधी धनबादच्या कतरास स्थित बासजोडा येथे आग लागली. यानंतर ती हळूहळू फैलावत गेली असून आता आगीने व्यापलेले क्षेत्र 30 किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे. कोळसा खाणीत गरम आणि शीत कोळशाच्या घषर्णातून ही आग लागली असून या आगीमुळे जमीन खचण्याचा धोका आहे. यामुळे पूर्ण रेल्वेमार्ग जमिनीत सामावू शकतो.

 

Related posts: